logo

स्वागत समारंभ

10 Jan,2026

कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे संचलित डी.सी नरके वरिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न.

शैक्षणिक निसर्ग सहल

27 Dec,2025

शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी निसर्ग सहल ही कोकण दर्शनासाठी गेली. यामध्ये आंबा घाट- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प- मारलेश्वर- गणपतीपुळे -आरेवारी बीच- पावस या ठिकाणी ही निसर्ग सहल अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली.या सहलीमुळे विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाची माहिती मिळाली.
या सहलीमध्ये बीए ,बीकॉम, बीएससी भाग 1,2,3 या सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. तसेच निसर्ग सहल प्रमुख सहा. प्रा.सारिका पाटील, समन्वयक सहा.प्रा. रोहित महाडिक, सहा. प्रा. प्रियांका पाटील, सहा.प्रा. राहुल कांबळे या सहलीमध्ये उपस्थित होते.

अग्रणी महाविद्यालय योजना

07 Oct,2025

डी. सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय कुडित्रे कोपार्डे येथे दि. 7/10/2025 रोजी विकसित भारत 2047 या विषयावर अग्रणी महाविद्यालय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तरी या कार्यशाळेचे बीज भाषण डॉ. पी.जी. कुंभार यांनी केले प्रमुख वक्ते म्हणून डॉ. यू. पी. पवार व डॉ. भरत नाईक लाभले होते.